पुणे : अलिकडच्या काळात जोडप्यांमध्ये घटस्फोट होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कधी सासरच्या जाचाला कंटाळून महिला जीवन संपवतात, तर कधी पतीच्या. मात्र, अलिकडे पत्नीच्या त्रासाला कंटाळून तरुणांमध्येही आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. अशातच आता अकोल्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तलाठ्याने पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्या आत्महत्येच्या बातमीने संपूर्ण अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अकोले जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालयात तलाठी म्हणून कार्यरत असणाऱ्या शिलानंद तेलगोटे (वय ३९) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. शिलानंद तेलगोटे यांनी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. शिलानंद यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हॉट्स अॅप स्टेटस ठेवले होते. यामध्ये ते पत्नीच्या त्रासाला किती कंटाळले आहेत. हे स्पष्ट दिसून येत आहे. पत्नी आपला मानसिक छळ करत असल्याचे म्हटले आहे.
काय होतं व्हॉट्स अॅप स्टेटस?
“माझा मृत्यूचे कारण माझी पत्नी ही आहे. माझी पत्नी माझ्या मुलासमोर मला खूप अश्लील शिव्या देते. वारंवार मला गळफास घेण्यास सांगते. तिचा भाऊ प्रवीण गायगोले त्यांच्याकडे माझे काही पैसे आहेत. त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली होती. ती त्यांनी व्याजासह देणे अपेक्षित आहे. कारण माझ्या पगारामधून रक्कम कटोती सुरू आहे. माझा मृत्यू झाल्यास माझी शेवटची इच्छा आहे. मी काही पीएम होणारा चेहरा नाही, त्यामुळे माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये. कारण मी पाच दिवस झाले जेवण केले नाही. माझ्या पत्नीने सोडून माझा चेहरा कोणीही पाहिलं तरी चालेल”, असे हृदयद्रावक स्टेटस शिलानंद यांनी ठेवले होते.
पोलिसांनी शिलानंद तेलगोटे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. या पोस्टमार्टेम रिपोर्टवर पोलिसांचा पुढील तपास अवलंबून असेल. दरम्यान, शिलानंद तेलगोटे यांनी व्हॉटसॲप स्टेटसमध्ये पत्नीने आपला छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आपले मृत्यूपत्रही तयार केले होते. यामध्ये त्यांनी आपली सर्व संपत्ती मुलाच्या नावावर केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील ‘या’ ४ शिलेदारांवर काँग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी
-दर अमावस्थेला नारळ दही-भात, अंडी ठेवत जादूटोणा करायची; महिलेचा व्हिडीओ व्हायरल
-पुण्यातील डॉक्टरचा प्रताप; पहिलं लग्न लपवलं दुसरंही केलं अन्…
-पुण्यातील बड्या नेत्याच्या घराबाहेर जादूटोणा, नेमका प्रकार काय?