बारामती : बारामती लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झालेला आहे. महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाला आहे. बारामती मतदारसंघामध्ये पवारांच्या प्रतिष्ठेची निवडणूक होती. दुसरीकडे अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला आहे . प्रचारासाठी दोघांनी जोर लावला होता. सुप्रिया सुळेंनी 16 व्या फेरी अखेर मोठी मुंसडी मारली आहे. सुप्रिया सुळेंना 1 लाख आठ हजार 490 चा लीड मिळाला आहे.
अजित पवार गेल्यानंतर महायुतीसोबत अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह हे घेतले होते. याउलट शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे नवे नाव आणि नवे निवडणूक चिन्ह घेऊन ही निवडणूक लढली. अशात निवडणूक चिन्ह आणि पक्षनाव घराघरांमध्ये पोहचवून विजय मिळवणं हे सुप्रिया सुळेंसाठी कठीण होतं. मात्र शरद पवार, सुप्रिया सुळे यांना तोडाफोडीच्या राजकारणामुळे बारामती मतदारसंघामध्ये मतदारांची सहानुभूती मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या आहेत. नणंद-भावजयच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते. बहुतांश सामान्य बारामतीकर शरद पवारांशी भावनिक रित्या कनेक्टेड आहे तर दुसरीकडे अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पैलवानानं मैदान मारलं: पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ; धंगेकरांचा दारुण पराभव
-‘काय म्हणता पुणेकर निवडून आलाय मुरलीधर’; थेट काँग्रेस भवनाच्या दारावर पोस्टर लावत धंगेकरांना डिवचलं
-मोहोळांची गाडी सुसाट: बाराव्या फेरीतही घेतली इतक्या मतांची आघाडी
-Pune | मुरलीधर मोहोळांचा पुन्हा आघाडी; किती मतांनी घेतली आघाडी?
-बारामतीत पवारांच्या प्रतिष्ठेची लढाई, नवव्या फेरीत सुप्रिया सुळेंचा लीड किती? पहा Live