पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आपापल्या तयारीला लागले आहेत. कोणत्याही क्षणी या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी पक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर बारामती या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अधिक प्रतिष्ठेची बनली आहे. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची कन्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशातच आता असतानाच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील एका कार्यक्रमात सूचक वक्तव्य केले आहे. ‘अजित पवार यांना अशीच साथ देण्याची गरज आहे. भविष्यातही तुम्ही ही साथ देणार, याची मला खात्री आहे. आतापर्यंत तुम्ही सर्वांनी मलाही खूप प्रेम दिलेलं आहे. त्यातून उतराई होण्यासाठी तुम्ही मला संधी द्याल, अशी अशा बाळगते’, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. सुनेत्रा पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
‘तुम्ही माझ्यावर नेहमीच खूप प्रेम करता. हे प्रेम असेच उदंड राहणार आहे, याची मला खात्री आहे. हे प्रेम शेवटपर्यंत असंच राहू द्या. तुमचे हे प्रेमच माझी उर्जा असणार आहे. तुमचे पाठबळ हीच माझी शक्ती आहे. अजित पवार यांच्यावर तर तुम्ही अनेक वर्षांपासून प्रेम करता. ते तर तुमचेच आहेत’, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.
‘मी तुमची सून असूनही मला तुम्ही जीव लावला. याला उतराई होण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करू. बारामतीकर, काटेवाडीकर येथील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी अजित पवार सतत प्रयत्न करत असतात. इथून पुढेदेखील त्यांचा हाच प्रयत्न राहील’, अशा भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया; एटीएस, एनआयए, सीबीआय, एनसीबीकडून देखील तपास
-घरबसल्या करता येणार मतदान; यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभर सुविधा, वाचा..
-दिलासादायक! भर उन्हाळ्यात पुणेकरांची पाणी कपात टळली; कालवा समितीच्या बैठकीत निर्णय
-घड्याळात वेळ झाली तुतारी वाजवण्याची; शरद पवार गटाकडून अनावरण सोहळ्याचा व्हिडीओ रिलीज
-शिंदे-फडणवीस-पवार २ मार्चला बारामतीत प्रचाराचा नारळ फोडणार!; अनेक विकासकामांचं उद्घाटन