पुणे : देशातील लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या अपयशानंतर आता महायुतीमध्ये चांगलीच नाराजी दिसून येत आहे. महयुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटावर विशेष करुन भाजपच्या गोटातून सातत्याने टीका केली जात आहे. राज्यातील अपयशाला अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असल्याचे अनेकांकडून बोलले जात आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून देखील अजित पवार गटावर निशाणा साधण्यात आला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीसोबत लढणार की स्वबळावर लढणार याबाबत राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच आता या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
इंदापूरमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला आणि हर्षवर्धन पाटील यांना सुद्धा मान्य असेल, असे दत्तात्रय भरणे म्हणाले आहेत. हर्षवर्धन पाटील आणि आम्ही सध्या बरोबर आहे. आम्ही एकत्र आहोत, मीडियाने आमच्यात उगाच भांडणे लावू नयेत.
दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून इंदापूरमधून दत्तात्रय भरणे हेच उमेदवार असतील असे चित्र आहे. तर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या सुद्धा याच मतदारसंघामधून इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपावरुन महायुतीमध्ये काय परिस्थिती असणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-जानाई-शिरसाई योजनेची बंदीस्त पाईपलाईन होणार; अजित पवारांनी किती कोटींचा दिला निधी?
-पदभार स्विकारताच मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये! पुण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मोहोळ दिल्ली दरबारी सक्रीय
-पब, बार, रेस्टॉरंटनंतर पीएमआरडीएची आता अनधिकृत होर्डिंगवर कारवाई
-Sushant Singh Rajput : सुशांतच्या आठवणीत अंकिता पुन्हा भावूक, खास दिवशी शेअर केला फोटो…
-Pune Hit & Run: न्यायालयातून महत्त्वाची अपडेट आली समोर, आज नेमकं काय घडलं?