पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार होते. मात्र, फडणवीसांच्या भेटीआधी अजित पवारांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. रात्री उशिरा अजित पवार दिल्ली दरबारी पोहचले. त्यानंतर रात्री १ ते ८ वाजेपर्यंत तब्बल ७ तास अजित पवार दिल्ली दौऱ्यावर होते. अजित पवार आणि अमित शहा यांच्या भेटीवरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आजच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आज संध्याकाळी साडे पाच वाजता अजित पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे. बैठकीमध्ये पक्षांतर्गत सर्व्हे, लाडकी बहिण योजना लोकांपर्यंत पोहोचवणे संदर्भातली रणनीती यासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आज कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर २ दिवसांनी अजित पवार दिल्लीला महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीसाठी जाण्याची शक्यता आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारावर तसेच विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. अमित शहांच्या भेटीनंतर अजित पवार ताबडतोब मुंबईला रवाना झाले.
महत्वाच्या बातम्या-
-लाडकी बहिण योजनेत १७ विघ्न; राज्य सरकारकडून पुन्हा एकदा ‘हे’ महत्वाचे ६ बदल
-पुण्यात २४ तास पावसाची संततधार; राज्यातील ‘या’ जिल्हांना सतर्कतेचा इशारा
-युपीएससीकडून गुन्हा दाखल झाला पण पूजा खेडकर गेल्या कुठे?
-वादग्रस्त पूजा खेडकरांचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र खोटं? चौकशीतून धक्कादायक माहिती समोर