पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर सध्या एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अजित पवारांनी या व्हिडीओमध्ये अर्थसंकल्पामधील महत्वाच्या योजना, तरतुदींवर विरोधकांनी केलेल्या टीका आणि त्यांच्यावर मध्यंतरीच्या काळात करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
मी विकासावर काम करतो, म्हणून विरोधकांच्या पोटात कळा यायला लागल्या आहेत. राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही. पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे. मी पूर्वीही जनतेचाच होतो, आजही जनतेचाच आहे”, असं अजित पवार या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.
महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश !#दादाचा_वादा pic.twitter.com/JOlKJZMxYY
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 4, 2024
“मी जे काही करतो, त्यात जनतेच्या हिताचाचा विचार करतो. विकासाच्या चाकाला अधिक गती कशी देता येईल याचाच विचार माझ्या डोक्यात चालू असतो. त्याच विचारातून हा अर्थसंकल्प बनवला आहे. त्यामुळे जे लोक अर्थसंकल्पावर नाकं मुरडत आहेत, त्यांचे चेहरे नीट बघून ठेवा. ही तीच लोकं आहे ज्यांना तुमच्या दारी विकासाची गंगा पोहोचू द्यायची नाही, सरकारी योजनांच्या लाभापासून तुम्हाला दूर ठेवायचं आहे”, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-वसंत मोरे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? आज मोरेंचा मोर्चा ‘मातोश्री’वर
-लढणार आणि जिंकणार! भिमालेंच्या रील्सने तापले पर्वतीचे राजकारण
-‘आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला महिन्याला…’; मुख्यमंत्री शिंदेंचं ठाकरेंवर प्रत्युत्तर