बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे १ लाखांपेक्षा जास्त माताधिक्य घेत दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव केला आहे. शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे पुन्हा एकदा खासदार झाल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. मात्र सुनेत्रा पवार यांचा बारामतीमध्ये पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये अजित पवार यांचेच नाव होते. बारामतीतीत मिळालेल्या पराभवावरुन त्यांच्या नावाचा संदर्भ देऊन ‘एक्स’वर पोस्ट टाकण्याचे प्रमाण वाढले. अनेक जणांनी त्यांना ट्रोल केले. तसेच, भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा समाचार घेतला. त्यामुळे ते ट्रेंडमध्ये कायम राहिले.
निकालाच्या दिवशी दिवसभर अजित पवार ट्वीटरवर ट्रेंडिंगमध्ये होते. अजित पवार गटाने महाराष्ट्रात एकूण ५ जागांवर निवडणूक लढली. त्यापैकी अजित पवारांना केवळ एकाच जागेवर विजय मिळाला आहे. रायगड मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे विजयी झाले आहेत. मात्र, अजित पवारांच्या बारामती या बालेकिल्ल्यातच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला.
अजित पवारांंनी सुनेत्रा पवारांचा प्रचार करताना अनेक आश्वासने दिली, मतदारांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला. त्यातच बारामतीमध्ये ‘सुनेत्रा पवारांचा पराभव झाला तर मी विधानसभेला निवडणूक लढणार नाही’, ‘त्यांचा पराभव झाला तर मी मिशी काढणार’, असे अजित पवार म्हणाले होते. त्यांचे हेच व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी मिशी कधी काढणार असा प्रश्न विचारत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Maval : बारणेंनी मावळची जागा राखली; किती मतांनी मिळवला विजय?
-सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांच ‘ते’ ट्वीट चर्चेत; अजित पवारांना म्हणाले, ‘बच्चा…’
-#BaramatiResult | ‘गुलाल आपलाच’ म्हणणारे सुनेत्रा पवारांचे बॅनर हटवले
-अजितदादांना काकांविरोधात बंड भोवले; बारामतीत सुप्रिया सुळेंचा १ लाखापेक्षा जास्त लीडने विजय