बारामती : लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या जाहीर भाषणामध्ये वक्तव्य केले होते. अजित पवारांचे हेच भाषण आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘बारामतीकरांनी लोकसभेत साथ नाही दिली तर विधानसभा निवडणुकीला उभं राहणार नाही’, असे वक्तव्य अजित पवारांनी केले होते. यावरुन आता अजित पवार हे विधानसभा निवडणूक लढणार नसल्याची चर्चा रंगू लागली आहे.
१६ फेब्रुवारी रोजी केलेल्या भाषणामध्ये अजित पवारांनी हे वक्तव्य केले होते. लोकसभेला बारामतीतून आपल्या विचारांचा खासदार निवडून दिला नाही. तर मी बारामतीतून विधानसभा निवडणुकीला उभे राहीन. नाही तर तुम्ही जर मला साथच देणार नसाल तर मला माझा संसार आहे. मी निवडणूक लढणार नाही, असे अजित पवार या सभेत म्हणाले होते. त्यांचं हे भाषण सध्या व्हायरल होत आहे.
अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व नेते, मंत्री, पदाधिकाऱ्यांसह हजेरी लावली आणि बारामतीच्या मिशन हायस्कूल मैदानावर जाहीर राष्ट्रवादी जन सन्मान रॅली आयोजित केली होती. या सभेला बारामतीकरांनी प्रचंड गर्दी केली होती. या सभेवरुन अजित पवार विधानसभा निवडणुकीची तयारी करताना दिसले. यावरुन अजित पवारांचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पवार कुटुंबातील २ सदस्य आमनेसामने आले होते. सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशा झालेल्या या लढतीत सुप्रिया सुळे जिंकल्या. मात्र त्यानंतर आता अजित पवार यांच्या जुन्या भाषणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अजित पवार यंदाची विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शेतकऱ्यांना पिस्तुल दाखवत दमदाटी करणं पडलं महागात; पुणे पोलिसांची मनोरमा खेडकरांना नोटीस
-श्री स्वामी समर्थ: स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना आज काय उपदेश दिले आहेत? वाचा…
-IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणी आणखी वाढल्या; आई मनोरमा खेडकरांना पालिकेने बजावली नोटीस