पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते फार वाढले आहेत. सगळीकडे पक्षांतराचे प्रमाण वाढले आहे. अशातच आता भोरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या पक्षाच्या शहराध्यक्षाने इतर पदाधिकाऱ्यांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांचाही सहभाग आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील जिजाई बंगला येथे हा पक्षप्रवेश करण्यात आला आहे. यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भोर शहराध्यक्षासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. ऐन लोकसभा निवडणुकीत हा पक्षप्रवेश झाल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तसेच माजी नगरसेवक यशवंत डाळ, अनंतराव थोपटे यांचे कार्यकर्ते असलेल्या जिल्हा दूध संघाचे संचालक दिलीप थोपटे यांचे पुतणे आणि अनंत दूधचे कार्यकारी संचालक नितिन थोपटे, काँग्रेसचे युवा कार्यकर्ते सोमनाथ ढवळे, सामाजिक कार्यकर्ते संदीप शेटे यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याला सभेसाठी जाताना शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
-Sholay | साऊथच्या ‘या’ चित्रपटाने दिली थेट ‘शोले’ला टक्कर; बॉक्स ऑफिसवर थलापथीचा धमाका
-Lok Sabha | ‘मतदानाच्या दिवशी कामगारांना फुल पगारी सुट्टी द्या’; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
-हडपसरमध्ये आढळराव पाटलांची सरसी, रॅलीला मिळतोय अभूतपूर्व प्रतिसाद
-“होय, माझा आत्मा अस्वस्थ आहे, पण…” शरद पवारांचे मोदींना खरमरीत उत्तर