पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शनिवारी (१६ मार्च) लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेच्या मतदारसंघापैकी एक म्हणजे शिरुर मतदारसंघ. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे खासदार अमोल कोल्हे हे उमेदवार असणार आहेत. मात्र महायुतीकडून या जागेबाबत उमेदावर निश्चित केला नव्हता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार गट या जागेसाठी आग्रही होता. मात्र आता अजित पवार यांनी स्वत: शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री शिवाजीराव आढळराव पाटील यांना कामाला लागा, प्रचार सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावरुन आता आढळराव पाटलांना उमेदवारी जाहीर होणार असल्याचं निश्चित झालं आहे.
आढळराव पाटील हे या लोकसभेसाठी पहिल्यापासूनच इच्छुक आहेत. त्यातच आता अजित पवार यांनी महायुतीकडून शिवसेनेच्या आढळराव पाटील यांना निवडणुकीच्या तयारीला लागा आणि प्रचाराला सुरवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज किंवा उद्या आढळराव पाटलांच्या नावाची अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांना धूळ चारली होती. त्यामुळे आढळराव पाटलांना शिरुरमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आढळराव पाटलांनी येत्या २०२४ च्या लोकसभेत अमोल कोल्हेंचा पराभव करण्याचा निश्चय केला. आज किंवा उद्या आढळराव पाटलांची अधिकृत उमेदवारी जाहीर होईल आणि शिरुर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पुन्हा आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे आमनेसामने दिसणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“फडणवीस कधीच चुकीचा पत्ता टाकत नाहीत, त्यांनी जाहीर केलेला उमेदवार निश्चित विजयी होतील”
-पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यावसाय; पोलिसांकडून ४ तरुणींची सुटका
-मावळमधून श्रीरंग बारणे हेच महायुतीचे उमेदवार; भाजपचं बंड शमलं
-पुण्यात ‘हे’ असणार काँग्रेस उमेदवार; चंद्रकांत पाटलांनी थेट नावच सांगितलं