पुणे : लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. मात्र जागावाटपाचं तेढ आणखी सुटलेलं नाही. याबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टोक्ती दिली आहे. ‘महायुतीच्या जागावाटपाचा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकी नंतर सुटणार आहे. लवकरच आम्ही आमचे उमेदवार जाहीर करणार आहोत’, असं अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार पुणे विमानतळावर नवीन टर्मिनलच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत भाष्य केले आहे.
“महाविकास आघाडीचा बारामती मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाला असून, आमचाही उमेदवार लवकरच घोषित करू. महायुतीच्या ४८ जागांचा निर्णय झाल्यानंतर आम्ही आमचे उमेदवार जाहीर करू. आम्ही किती जागा मागितल्या हे जाहीर करणार नाही परंतु, व्यवस्थित जागा मागितल्या आहेत. तिन्ही पक्षांचा सन्मान राहील अशा पद्धतीने जागावाटप
होईल”, असं अजित पवार स्पष्ट म्हणाले आहेत.
“उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह मी दिल्लीला जाणार आहे. तिथे जागावाटपावर चर्चा होईल. जागावाटप उद्या अंतिम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोनच दिवसांत याबाबत चित्र स्पष्ट झालेले दिसेल”, असे पवार यांनी सांगितले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जागावाटपांची वाटाघाटी सुरु आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार कडून ‘आम्ही शिवसेने (शिंदे गट) इतक्या जागा लढणार’ असल्याचं बोललं जात आहे. त्यातच महायुतीतील सर्वात मोठा पक्ष भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेने इतक्या जागा दिल्या तर भाजपची पुढील गणितं बिघडू शकतात. भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आता महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल हे येत्या २ दिवसांतच स्पष्ट होईल. कोणाला किती जागा मिळण्याची संधी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘आम्ही भेटलो म्हणजे आमचं मनोमिलन नाही’; कट्टर विरोधक दिलीप मोहितेंची आढळरावांवर नाराजी कायम
-“कार्ट्यांना नीट सांभाळा…आता कोयता गँगचा सुपडाच साफ करणारे”- अजित पवार
-राहुल गांधीविरोधात दाखल दाव्यात कसूर; न्यायालयाने पोलिसांना बजावली कारणे दाखवा नोटीस
-धक्कादायक! समलैंगिक असल्याचं लपवून केला विवाह; महिलेनं गाठलं पोलीस स्टेशन
-दर्ग्याचे ट्रस्ट स्वतः दर्ग्याच्या बाजूचं अतिक्रमण हटवणार; तणाव निवळणार