पुणे : गेल्या काही दिवसांपासून अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून सडकून टीका करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात शरद पवार यांनी ‘राज्याचा अर्थसंकल्प अजित पवारांनी विधानसभेत मांडण्यापूर्वीच फुटला होता’, असा दावा केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतरही काही नेत्यांनी अजित पवारांना लक्ष्य करताना हा आरोप केला आहे. आमदार जयंत पाटील यांनीही अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान अर्थसंकल्प फुटल्याचा उल्लेख केला होता. या पार्श्वभूमीवर आज विधानसभेत आज अजित पवारांनी अर्थसंकल्प फुटल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
“भाषणाच्या सुरुवातीलाच मी एक गोष्ट स्पष्ट करतो. अर्थसंकल्प फुटल्यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि जयंत पाटील यांनी विधान केलं. हे दोन्ही सदस्य अतिशय ज्येष्ठ आहेत. अर्थसंकल्पापूर्वी वर्तमानपत्रात नेहमीच अर्थसंकल्पातील तरतुदी छापून आल्याबाबत त्यांनी आक्षेप घेतला. जयंत पाटील यांनी तर ९ वेळा अर्थमंत्रालयाची जबाबदारी सांभाळली आहे. अर्थसंकल्पाकडून नागरिकांच्या काही अपेक्षा असतात. या अपेक्षांचा कानोसा घेऊन माध्यमांमध्ये त्यावर चर्चा होत असते. त्यासंदर्भातल्या बातम्या छापल्या जात असतात. लोकांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब त्यात दिसत असतं”, असे अजित पवार म्हणाले आहेत.
“अर्थसंकल्पापूर्वी काही बातम्या वर्तमानपत्रात, माध्यमांमध्ये आल्या म्हणजे अर्थसंकल्प फुटला असे म्हणता येणार नाही. हे सदस्य तसे म्हणत असतील तर ते माध्यमांवर अन्याय करणारे आहे. मी स्पष्टपणे सांगतो की, अर्थसंकल्प कुठेही फुटलेला नाही. त्याची गोपनीयता पूर्णपणे राखली गेली आहे”, असे अजित पवार म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार; जीव वाचवणाऱ्या डॉक्टरनेच घेतला बळी, निघाला कोयता गँगचा मेंबर
-टिंडर डेंटिंग अॅपवरची ओळख महिलेला पडली महागात; वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन जबरदस्तीने बलात्कार
-पुणे कार अपघात प्रकरण: अखेर २ महिन्यांनंतर बिल्डर पुत्राने लिहला ३०० शब्दांत निबंध
-राज्यात येत्या २ दिवसांत मुसळधार सरी बरसणार; ‘या’ भागात यलो अन् ऑरेंज अलर्ट
-वसंत मोरेंचा प्रकाश आंबेडकरांना फोन; अन् म्हणाले, ‘साहेब मला माफ करा’ का मागितली माफी?