पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती, पुणे, मावळ, शिरुर लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. मोदींनी पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला. मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता ही टीका केली. मात्र त्यांचा रोख शरद पवारांकडेच होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मोदींच्या ‘अतृप्त आत्मा’ या टीकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
“पंतप्रधान नेमकं कोणाबद्दल बोलले ते माहिती असायला मी काही ज्योतिषी नाही. त्यांच्या मनात नक्की कोण ते… त्याबाबतीत मी पुढच्या सभेत मोदींना विचारेन… आमची पुढची प्रचारसभा जिथे असेल आणि तिथे मीदेखील असेन तर मी तेव्हा मोदींना त्या वक्तव्याबाबत विचारेन… भटकत्या आत्म्याचं नाव काय तेदेखील विचारेन. त्यांनी नेमका कोणत्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे वक्तव्य केलं त्याबाबतही विचारेन. त्यांनी मला नाव सांगितलं की मी ते तुम्हाला सांगेन”, असं अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
दरम्यान, नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शरद पवार गटाकडून मोदींवर आगपाखड करण्यात येत आहे. “महाराष्ट्र हे आमचं शरीर म्हणजेच पंढरी आहे आणि विठ्ठल हा या पंढरीतला आत्मा आहे. म्हणूनच स्वतःचं आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येताच मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली, पण इथे येऊन त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेण्याऐवजी त्यांना अस्थिर आत्मे दिसू लागले आहेत”, असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-राज्यात उन्हाचा कडाका वाढला; या भागात ‘यलो अलर्ट’ जारी
-AIMIM चा पुण्यात जोरदार प्रचार; अनिस सुंडकेंच्या पदयात्रेला नागरिकांचा प्रतिसाद
-‘मुस्लिम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात’; पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ टीकेवर ओवैसींचं प्रत्युत्तर
-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना ‘भटका आत्मा’ म्हणून केला उल्लेख
-“दुसऱ्यांवर टीका करून सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न”; आढळरावांचा अमोल कोल्हेंवर घणाघात