पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्व पक्षांची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. येत्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काही भागांमध्ये निवडणूक चिन्ह ‘घड्याळ’ हे चिन्ह वापरता येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय घेतल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लक्षद्वीपमध्ये ‘घड्याळ’ चिन्ह वापरता येणार नाही. मात्र, महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकांसाठी अजित पवार घड्याळ हे चिन्ह वापरु शकतात. अजित पवार गटाने उशिरा अर्ज सादर केल्याने पहिल्या टप्प्यात घड्याळ चिन्ह वापरता येणार नसल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी लक्षद्वीपमध्ये पाहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.
महाराष्ट्रातील मावळ, शिरुर, बारामती, रायगड आणि परभणी या जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यामुळे निवडणूक आयोगाने बहुमताच्या जोरावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला घड्याळ हे चिन्ह दिले. तर शरद पवार यांच्या गटाला तुतारी हे चिन्ह मिळाले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता अजित पवारांना निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला. वेळेत अर्ज दाखल केला नसल्याने अजित पवारांना घड्याळ चिन्हाच्या वापरावर मर्यादा येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“मी बारामतीची निवडणूक लढणार मग दुसऱ्यांच्या घरात कशाला डोकावू?” सुप्रिया सुळेंचा खोचक टोला
-आधी विरोध आता सुनील शेळकेंचा युटर्न! बारणेंच्या उमेदवारीवर घेतला मोठा निर्णय
-ओ ऽऽऽमोठ्ठया ताई… शिवतारेंचे बंड थंड होताच चित्रा वाघांनी सुळेंना डिवचलं
-पुण्यात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी! ठाकरे गटाने केली ‘ही’ मागणी; धंगेकरांचे टेन्शन वाढलं!