पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या बिगुल वाजलं. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. एकीकडे राजकीय पक्षांच्या निवडणूक तयारीला वेग आला. तर दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु आहे. गेल्या काही दिवसांत तब्बल ६०० पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असून पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर हे येत्या शनिवारी राजीनामा देणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
६०० पदादिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणखी 250 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधान परिषदेवर संधी न दिल्यामुळे पदाधिकाऱ्यांची नाराजी कायम असल्याचे दिसून येत आहे. पक्षाच्या विविध पदांवरुन पदाधिकारी राजीनामे देत आहेत. आता राजीनामा देणाऱ्यांची संख्या 850 वर पोहोचली असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य पदासाठी दीपक मानकर यांच्या नावासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांकडे मागणी केली होती. परंतु मानकरांना डावलून इतरांना संधी दिल्याने नाराज पदाधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी धडाधड ६०० राजीनामे दिले. त्यानंतर आता आणखी २५० राजीनामे दिले आहेत. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील नाराजी नाट्य अन् राजीनामा सत्राचा अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. यावर आता अजित पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘अजितदादा मिटकरींना आवर घाला अन्यथा…’; भाजपच्या इशाऱ्याने बारामतीत दादांची डोकेदुखी वाढली
-तिसऱ्या आघाडीचं १५० जागांबाबत ठरलं! शिंदे-फडणवीस अन् ठाकरे-पवारांसोबत भिडणार
-“मला विधिमंडळात जायचंय महामंडळात नाही”, श्रीनाथ भिमालेंचा पर्वतीत लढण्याचा निर्धार कायम
-“भोसरीच्या मातीत समोरच्याला उचलून टाकणारे पैलवान जन्माला येतात, चावणारे नाही” -महेश लांडगे
-दीपक मानकरांच्या पत्रकार परिषदेनंतर रुपाली चाकरणाकरांची प्रतिक्रिया म्हणाल्या…