पुणे : राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन सुरु असून ॲड. राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या अभिनंदनाच्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलेच चिमटे काढताना पहायला मिळाले आहे. ‘निवडणुकीच्या काळात अनेक जण संविधान हातात घ्यायचे. संविधान हातात घेतले म्हणजे आदर वाटतो आणि जे घेत नाहीत त्यांना संविधानाबद्दल आदर नसतो असे आहे का?, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
‘निवडणूक घेण्याचा अधिकार संविधानाने निवडणूक आयोगाला दिलेला आहे, तो सामान्य जनतेला नाही. मारकडवाडीबद्दल आम्हालाही आपलेपणा, प्रेम, जिव्हाळा आहे. पण, कारण नसताना बाऊ केला जात आहे. कधी तरी लक्षात घ्या की, आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे. आपल्याला जनतेने नाकारले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं. तेव्हा विरोधकांना गारगार वाटत होतं’, असं म्हणत अजित पवारांनी पहिल्याच भाषणात विरोधकांचा समाचार घेतला आहे.
जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, आमची बाजू खरी आहे, त्यात कुठेही खोट नाही..! pic.twitter.com/ftvznqKnwE
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 9, 2024
‘आमची बाजू खरी आहे, त्यात कोठेही खोटं नाही. लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४२. च्या वर काही तरी टक्के मते होती, तर आघाडीला ४३ टक्के मते होती. आघाडी आणि महायुतीमध्ये फक्त ०.६ टक्क्यांचा फरक होता. तरीही आमच्या जागा १७ आणि त्यांच्या जागा ३१ आल्या. तेव्हा आम्ही रडत नाही बसलो. ठीक आहे जनतेचा कौल आहे, असे समजून लढत राहिलो. तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं. तेव्हा गारगार वाटायचं, ईव्हीएम चांगल वाटायचं. आता गारगार वाटतं की गरम वाटतंय ते तुमचं तुम्हीच बघा’, असं अजित पवार म्हणाले आहेत.
लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूनं जनतेनं कौल दिला, मात्र त्याबद्दल आम्ही कसली तक्रार केली नाही, रडत बसलो नाही.. जनतेचा कौल मान्य केला. जनतेत गेलो, पुन्हा लढलो आणि पुन्हा जिंकलो..! pic.twitter.com/gal3Bpwts6
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 9, 2024
महत्वाच्या बातम्या-
-‘मी पुण्याचाच, यावर शिक्कामोर्तब’; चंद्रकात पाटलांचं टीकाकारांना प्रत्युत्तर
-बावधनमध्ये खासगी स्टुडिओला भीषण आग; आगीवर नियंत्रण पण स्टुडिओ जळून खाक
-पुणे पुन्हा गारठणार! येत्या ५ दिवसात तापमानाचा पारा घसरणार
-बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर जरब बसवा, चंद्रकांत पाटलांच्या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना