पुणे : विधानसभा निवडणुकीच्या धूमधडाक्यात प्रचार सुरु असून मतदारसंघात फिरुन उमेदवार तसेच पक्षांच्या वरिष्ठांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांकडून प्रचार सुरु आहे. मतदारसंघात जितक्या ताकदीने प्रचार सुरु आहे तितक्याच ताकदीने सोशल मीडियावरही सुरु आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हक्क मागतोय महाराष्ट्र हे जाहिरात कॅम्पेन रावबत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.
महाविकास आघाडीकडून व्हायरल करण्यात आलेल्या एका जाहिरातीमधून उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit pawar) लक्ष्य करत त्यांचे पात्र दाखवण्यात आले आहे. या जाहिरातीविरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून जाहिरातीमधील मजूकर आणि अजित पवारांच्या पात्राचा उल्लेख करत तक्रार दाखल केली आहे. या जाहिरातीमधून अजित पवारांची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न महाविकास आघाडीच्यावतीने केला जात आहे, असे चव्हाण यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही पत्रातून करण्यात आली आहे.
जाहिरातीमध्ये बदनामीकारण मजकूर, खोट वृत्त आणि वादग्रस्त आशयाची व्हिडिओ जाहिरात बनवून अजित पवारांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सूरज चव्हाण यांनी तक्रारीत म्हणाले आहेत. या जाहिरातीमध्ये एका महिलेशी बोलताना अजित पवार हे महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये दिले ना असं सांगताना दिसतात. मात्र, ह्या दीड हजारांचा दादा तुमचा वाद फसवा असल्याचं ती महिला म्हणत आहे.
काय आहे ती जाहिरात?
खोटा दादा, फसवा वादा
हे सरकार महाराष्ट्राच्या हक्कात बाधा!Credit – @NCPspeaks pic.twitter.com/sUhHOYe1en
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 4, 2024
महत्वाच्या बातम्या-
-काँग्रेसच्या कारवाईनंतर कमल व्यवहारे आक्रमक; म्हणाल्या, ‘राजीनामा दिला तरीही…’
-“कसब्याच्या जनतेने नेहमीच भाजपला साथ दिली, यंदाही जनता आमच्यासोबत”, सी. टी. रविंचा विश्वास
-एकीकडे मुख्यमंत्री शिंदे, अजितदादा, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे, पुण्यात प्रचारसभांचा धुराळा
-कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांना वाढते समर्थन, रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
-सत्ताधारी आमदारांना कळेना नियम, मनमर्जी कारभार; अखेर गुन्हा दाखल