पुणे : राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक योजना सुरु केल्या आहेत. सर्वाधिक चर्चेत असणारी म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना. या योजनेवरुन सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी चांगलीच टीका केली. राज्याच्या तिजोरीवर आधीच बोजा असताना देखील ही योजना राबवली जात असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली. त्यावरुन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरीमध्ये बोलताना लाडकी बहिण योजना बंद करणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.
‘राज्याच्या तिजोरीत खडखडाट, राज्य दिवाळखोरीत निघाल्याची टीका विरोधक करत आहेत. त्याकडे लक्ष देऊ नका. मी राज्याचा दहावा अर्थसंकल्प मांडला आहे. महाराष्ट्र राज्य मजबूत असून आर्थिक परिस्थिती चांगली आहे. देशात सर्वात जास्त वस्तू व सेवा कर (जीएसटी) महाराष्ट्राला मिळतो. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने लाडकी बहीणसह कोणतीही योजना बंद करण्यात येणार नाही’, असे अजित पवार म्हणाले आहेत.
पिंपरीमध्ये आज अजित पवारांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन झाले. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. ‘पिंपरी-चिंचवड औद्योगि नगरी आहे. त्यात शहराची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे मूलभूत गरजाचा पोहचवता आले पाहिजे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सुविधा पुरविताना ताण येत आहे. राज्याच्या विकासाचे इंजिन म्हणून शहराकडे पाहिले जात. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत’, असे अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात शिवसेनेने दावा सोडला; हडपसरमधून इच्छुक नाना भानगिरे म्हणाले…
-अजितदादांना धक्का देण्याची तयारी; सुप्रिया सुळेंच्या गाडीत तोंड लपवणारा ‘तो’ नेता कोण?
-पिंपरीत झळकले गुलाबी बॅनर्स; अण्णा बनसोडेंच्या बॅनर्सची राजकीय वर्तुळात चर्चा
-शिवसेनेच्या शिंदेंच्या गटाची पुण्यातून माघार, पण ‘या’ जागांवरुन लढणारच!
-जय शंभू महादेवा! बिग बॉस विजेता सुरज चव्हाण घरी जाण्याआधी पोहचला जेजुरी गडावर