बारामती : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीतमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवारांना सर्वात जास्त फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांना लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्याचे पहायला मिळाले आहे. लोकसभेत मिळालेल्या पराभवानंतर अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे.
Live: बारामती येथील ‘जन सन्मान रॅली’ #राष्ट्रवादी_जनसन्मान_रॅली #NCPJanSanmanRally https://t.co/8uIEgjGm6O
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 14, 2024
अजित पवारांना बारामतीमधून अनपेक्षित असा पराभव पत्कारावा लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बारामतीकरांची मने जिंकण्यासाठी अजित पवारांनी आज बारामतीमध्ये जाहीर राष्ट्रवादी जन सन्मान रॅली आयोजित केली आहे. बारामतीमधील मिशन हायस्कूलच्या मैदानावर अजित पवार त्यांच्या सर्व नेत्यांसह सभा घेत आहेत.
बारामतीची जन सन्मान रॅली,
सर्वांसाठी आनंद घेऊन आली.#राष्ट्रवादी_जनसन्मान_रॅली#NCPJanSanmanRally pic.twitter.com/Fng0IPicdj— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 14, 2024
दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, खासदार सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, नरहरी झिरवाळ, अदिती तटकरे, सुनेत्रा पवार, रुपाली चाकणकर हे सर्व नेते, मंत्री, पदाधिकारी बारामतीमध्ये आयोजित सभेला उपस्थित आहेत. तसेच बारामतीकरांनी भर पावसातही अजित पवारांच्या या सभेला हजेरी लावली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शेतकऱ्यांना पिस्तुल दाखवत दमदाटी करणं पडलं महागात; पुणे पोलिसांची मनोरमा खेडकरांना नोटीस
-श्री स्वामी समर्थ: स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना आज काय उपदेश दिले आहेत? वाचा…
-IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणी आणखी वाढल्या; आई मनोरमा खेडकरांना पालिकेने बजावली नोटीस