पुणे : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीसोबत जात बंड केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि २ गट पडले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले. अखेर, अजित पवार गटच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला.
निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवं नाव आणि पक्षचिन्ह दिलं आहे. या पक्षचिन्हाचं किल्ले रायगडावर अनावरण सोहळा पार पडला. नवं चिन्ह मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने उत्साहात प्रचाराला सुरवात केली आहे. अशातच अजित पवारांनी राज्यातील जनतेसाठी पत्र लिहून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्याबाबत अनेक माध्यमांतून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. याविषयीची माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं केलेला हा पत्रप्रपंच… pic.twitter.com/3fIlE1DFQU
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 25, 2024
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्या बाबत अनेक माध्यमातून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. या बाबत माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने या बाबत केलेला हा पत्रप्रपंच”, असं अजित पवारांनी सुरुवातीलाच म्हटलं आहे.
पहाटे पाचपासून काम सुरू करण्याची सवय स्वतःला लावून घेतली, कारण हातात असलेल्या वेळेत समाजोपयोगी, विधायक व विकासाची कामे वेगाने मार्गी लागावीत. ज्या मतदारांनी भरभरून प्रेम केलं, विश्वास व्यक्त केला, त्यांचे जीवनमान अधिक कसे उंचावेल यासाठी कायमच मी प्रयत्न केला, असं अजित पवार आपल्या पत्रातून म्हणाले आहेत.
विचारधारा, ध्येयधोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकासकामे वेगाने मार्गी लागावेत, याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली, यात कोणाचाही अवमान करणे, कोणाच्याही भावना दुखाविणे, कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल, असे अजित पवार म्हणाले आहेत.
या पत्रातून अजित पवारांनी ‘वडीलधाऱ्या माणसांनी सोबत राहावं, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांनाच आवाहन केल्याचं दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिक्रापूरच्या शेतकऱ्यानं केली अफूची शेती; पोलिसांकडून १ हजार २२६ झाडे जप्त
-बारामतीत पोस्टर झळकले ‘सुनेत्रा पवार फिक्स खासदार’; अजित पवार गटाचा उमेदवार ठरला???
-ड्रग्ज रॅकेट: पुणे पोलिसांनी देशातील सर्वात मोठी कारवाई; फडणवीसांनी दिले २५ लाखांचे रोख बक्षीस
-मोहोळ, मुळीक की देवधर, माध्यमांच्या सर्व्हेत खासदारकीसाठी ‘हे’ नाव आघाडीवर
-पुण्यात कोट्यावधींचे ड्रग्ज: तरुणाई नशेत टुल्ल; पिट्याभाईंच्या त्या व्हिडीओने राज्य हादरलं