पुणे : बीडच्या अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या ज्ञानेश्वरी अंजान या तरुणी सनगाव येथील सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि बीडची अमानुषता पुन्हा एकदा समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत मारहाण प्रकरणी सरपंचसह १० जणांवर युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
आज पिंपरी-चिंचवड चाफेकर स्मारक समितीच्या कार्यक्रमानिमित्त आले असताना अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘कायदा श्रेष्ठ आहे. अशा प्रकरणात कोणालाही पाठिश घालतं जाणार नाही’, असं अजित पवारांनी सांगितलं आहे. “मारहाणी फोटो व्हिडीओ माझ्याकडे आले आहेत. या प्रकरणी मी एसपी आणि कलेक्टर यांना सूचना दिल्या आहेत. हे नक्की कुठं घडलं आहे? ह्या घटनेला कोण जबाबदार आहे? आणि जर ते तिथंच घडलं असेल तसेच या घटनेला जबाबदार कोण असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. कायदा श्रेष्ठ आहे. कोणाही पाठीशी घातलं जाणार नाही. तसेच त्यांच्यावर सक्त कारवाई करा अशा सक्त सूचना दिल्या आहेत”, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
अंबेजोगाई तालुक्यातील सेनगाव या गावातील वकिल ज्ञानेश्वरी अंजान या महिलेला मायग्रेनचा त्रास आहे. त्यामुळे या महिलेने मंदिरावरील लाऊड स्पीकर आणि घरासमोर असलेल्या गिरणींमुळे कर्कश आवाज होत असल्याचे सांगून आवाज कमी करण्याची विनंती सरपंचाकडे केली. सरपंचाकडून आवाज कमी केला गेला नाही, टाळाटाळ केली. त्यामुळे या महिलेने थेट पोलीस स्टेशन गाठलं अन् याबाबत तक्रार दिली. यावर पोलिसांत तक्रार दिली म्हणून सरपंचासह त्याचे कार्यकर्ते महिला वकिलाच्या घरी गेले. तिच्या आई-वडिलांना माफी मागायला लावली. एवढ्यावर न थांबता महिला वकिलाला एका शेतात नेत काठ्या आणि जेसीबी पाईपने गोल रिंगण करत बेदम मारहाण केली. यात ती महिला वकील बेशुद्ध पडली. तिला दवाखान्यात नेण्यात आले. रात्री उपचार करून घरी पाठवून देण्यात आले. या संपूर्ण घटनेनंतर तिला मारहाण झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि बीडची आणखी एक अमानुषता समोर आली. बीडची गुन्हेगारी कधी थांबणार? हाच एक प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या
-‘खोट्या शपथा घेणाऱ्या गोप्याला कुणीही फारसे महत्व देऊ नये’; अजित पवारांचे नेते पडळकरांवर आक्रमक
-‘आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय, महाराष्ट्रात रहायचं असेल तर…’; अजित पवारांचं वक्तव्य
-स्वारगेट प्रकरण: न्यायालयात भक्कम पुराव्यासह ८९३ पानांचं आरोपपत्र दाखल; दत्ता गाडेचा ‘तो’ दावा फोल
-‘मी २२ व्या वर्षीपासून सफारी गाडीतून फिरतो, तेव्हा तुम्हाला चड्डी पण…’; पडळकर नेमकं कोणाला म्हणाले?