पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी लोकसबा निवडणुकीमध्ये एकत्रित लढली. मात्र महाराष्ट्रात महायुतीला म्हणावं असं यश मिळालं नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांना महायुतीमध्ये घेतल्याने लोकसभेत यश मिळालं नसल्याचं अनेक जण म्हणाले. यावरुन अजित पवारांबाबत भाजपच्या अनेक नेत्यांकडून करण्यात आलं होतं. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देखील अजित पवार महायुतीमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुती एकत्रित लढणार असल्याचे जाहीर केले आहे. असे असले तरी जागा वाटपाच्या समोर आलेल्या सूत्रानुसार सर्वात कमी जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. त्यामुळे ते स्वतंत्रपणे लढतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या चर्चेवर आता माजी गृहमंत्री, शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी देखील वक्तव्य केले आहे.
‘कमी जागा देऊन त्यांनी वेगळे लढावे’ असा संदेश या माध्यमातून भाजपने त्यांना दिला असल्याची शंका आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांना आणि शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका करणाऱ्यांना परत घ्यायचे नाही असा निर्णय आधीच झाला आहे. त्यामुळे भेटीगाठी घेतल्या म्हणून ते पक्षात परत येतील, असा त्याचा अर्थ होत नाही’, असंही अनिल देशमुख म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीत जाणार, पण कधी? पाटील म्हणाले, ‘तो निर्णय …’
-हर्षवर्धन पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; सांगितलं फडणवीसांसोबतच्या बैठकीत सत्य
-हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या,
-‘राम कृष्ण हरी’ म्हणत पाटील वाजवणार ‘तुतारी’; पत्रकार परिषद घेत जाहीर केला निर्णय
-हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी? पवारांचे निष्ठावंत दुखावले, मानेंची आक्रमक भूमिका