पुणे : बारामतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून सुरवातीपासूनच पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जाते. मात्र आता याच बालेकिल्ल्यामध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेनंतर आता अजित पवारांचे कट्टर समर्थक नाना काटे हे शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवारांना महाराष्ट्रामध्ये धक्का बसल्यानंतर आता आगामी विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये पक्षातील पदाधिकारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने अजित पवारांना येत्या विधानसभा निवडणुकीमध्येही मोठा फटका बसणार असल्याचे दिसत आहे.
गेल्या वर्षी चिंचवडची पोटनिवडणूक लढलेले अजित पवारांचे कट्टर समर्थक नाना काटे काहीही झाले तरी, मी चिन्हावरच लढणार, यावर ते ठाम आहेत. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह शरद पवारांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवारांनी सर्वांसाठी दारे खुली ठेवल्याचे जाहीर केले. अशातच आता नाना काटे देखील शरद पवार गटामध्ये घरवापसी करतील अशी शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातील मेट्रो स्थानकावर घडली मोठी घटना; प्रवाशाला गमवावा लागला जीव, वाचा नेमकं काय झालं?
-‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’, लाभ घेण्यासाठी काय करायचं? वाचा…
-Pune Metro: पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत दुपटीने वाढ; एका दिवसांत किती लाख रुपयांची कमाई?
-विधान परिषदेत आंबादास दानवे आक्रमक; भाजपच्या प्रसाद लाड यांना शिवीगाळ
-पुणेकरांनो सावधान! आणखी एका गर्भवती महिलेला झिकाची लागण; रुग्णसंख्या ६ वर पोहचली