पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अनौपचारिक गप्पा मारताना वेश बदलून दिल्लीला गेल्याचे सांगितले असल्याच्या काही बातम्या समोर आल्या. त्यानंतर यावरुन अनेक तर्क लावण्यात गेले. यावरुन येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून अजित पवारांना टीकेचे लक्ष्य केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याआधी अजित पवारांनी या भेटी गाठी घेतल्या असल्याचा दावा करण्यात येत आहे.
माझी बदनामी करणं, सातत्याने गैरसमज निर्माण करणे, असा प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून मी बातम्या पाहतोय, राजकीय नेत्यांनी वक्तव्ये केली आहेत, की अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे. हे धादांत खोटंं आहे. माझी बदनामी करण्याचं काम सुरु आहे. काहींनी पार अधिवेशनात शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. अजित पवार नाव बदलून गेले म्हणे.
“मी ३५ वर्षं राजकीय जीवनात कार्यरत आहे. खासदार, आमदार, राज्यमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री अशी अनेक पदं मी सांभाळली आहेत. एक जबाबदारी मलाही कळते. एखाद्यानं नाव बदलून जाणं हा गुन्हा आहे. सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. खुशाल काहीही बोललं जातंय. कोण बहुरुपी म्हणतंय, कोण काय म्हणतंय. म्हणणाऱ्यांना लाज, लज्जा, शरम वाटली पाहिजे. माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत”, असे अजित पवार सांगताना अजित पवार चांगलेच भडकल्याचे पहायला मिळाले.
‘तुम्हाला कोठे पुरावा मिळाला मी मिशी लावून नाव बदलून प्रवास केला. टोपी, मास्क लावले. मला समाज ओळखतो. जर हे सिद्ध झालं तर मी राजकाणातून सन्यास घेईन. ज्या लोकांनी संसदेपासून इथंपर्यंत नौटंकी लावली आहे, त्यांना जनाची नाही निदान मनाची तरी लाज वाटायला हवी’, असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांकडून बदनामीचा प्रकार सुरु असल्याचा आरोप केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांनो सावधान! झिका व्हायरसने घेतला चौथा बळी; ‘या’ भागात जास्त धोका?
-Kasba Vidhansabha: मैदानात कोण उतरणार? भाजपसह काँग्रेस, शिवसेना, मनसेत इच्छुकांची भाऊगर्दी
-मनोज जरांगे विधानसभा लढवण्यावर ठाम; पुण्यातील सर्व मतदारसंघाचा घेतला आढावा
-उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवरुन चंद्रकांत पाटलांचा सणसणीत टोला; म्हणाले, ‘त्यांच्या भाषणात…’