पुणे : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जोमाने तयारी सुरु आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीच्या या सामन्यात दोन्ही बाजूने जागावाटप अद्याप झालेले नाही. अशातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमधून आजपासून जनसन्मान यात्रेला सुरवात केली आहे. यावेळी अजित पवारांनी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्मुयला सांगितला आहे. अजित पवार ‘एएनआय’शी बोलत होते.
‘आमच्या तीनही पक्षांकडे ज्या-ज्या जागा आहेत त्या-त्या जागा त्यांच्याकडे ठेवल्या जातील. पण जर काही सिटींग जागा बदलायच्या असतील तर त्याही प्रकारची तयारी आणि मानसिकता तिन्ही पक्षांनी आणि मित्र पक्षांनी ठेवली आहे. आता लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिलेले आपल्या पाहण्यात येईल, असे अजित पवार म्हणाले आहेत.
‘आम्हाला पुन्हा संधी द्या, लोकांना विनंती करणार. मागच्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी एक नरेटीव्ही सेट केलेलं. संविधान बदलणार आरक्षण काढणार, असं नेरटीव्ह सेट करुन लोकांची दिशाभूल केली. लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्याची मोठी किंमत महायुतीला चुकवावी लागली’, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली असती तर मी सगळा पक्षच…’; अजित पवार असं का म्हणाले?
-पुणेकरांचं टेन्शन वाढलं; एका दिवसात तब्बल ७ रुग्णांची नव्याने नोंद
-पुण्यात पुन्हा पूरस्थिती; मुख्यमंत्र्यांच्या आदेश येताच शिवसेना धावली नागरिकांच्या मदतीला!
-पर्वतीत यंदा काँग्रेसचाच आमदार! आबा बागुलांना विश्वास; नाना पटोलेंच्या भेटीनंतर पोस्ट करत म्हणाले….
-Pune: पुराच्या पाण्याखाली गेलेल्या वाहनांना मिळणार इन्शुरन्स; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश