पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणाचे राज्यभरासह राज्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटले आहेत. या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव समोर येत आहे. सुनील टिंगरे हे अपघातानंतर आरोपीला अटक होताच पोलीस ठाण्यात गेले होते. त्यामुळे टिंगरे यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. यावर सुनील टिंगरे यांनी यापूर्वीच खुलासा केला आहे.
सुनील टिंगरे यांचे या प्रकरणात नाव आल्याने राष्ट्रवादीची वडगाव शेरी मतदारसंघात डोकेदुखी वाढली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारही सुनील टिंगरेंवर चांगलेच नाराज असल्याची माहिती मिळत आहे. ‘आमदारकी कशी आणि कुठे वापरायची हे कळतं का?’ अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी सुनील टिंगरे यांना खडेबोल सुनावल्याची माहिती मिळत आहे.
२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुनील टिंगरे यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळेस त्यांनी भाजपचे जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता. मात्र त्यानंतर बदललेल्या राजकीय गणितांमध्ये आता महायुतीमध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळू शकतो. मात्र सुनील टिंगरे यांच्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसची गोची झाली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला हातचा मतदार संघ गमवावा लागू शकतो.
महत्वाच्या बातम्या-
-धक्कादायक: विशाल अग्रवालचे डॉ. तावरेंसोबत २ तासात १४ फोन; ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्लॅन कोणाचा?
-पोलीस कारवाईचा बार मालकांनी घेतला धसका, “आता टेबलवर ग्राहकांना दिला जातोय….”
-मलायका आरोराच्या ‘त्या’ कृत्यामुळे सर्वत्र होतंय कौतुक; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल