इंदापूर : बारामती लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना आहे. बारामतीमध्ये पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगत आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांची साथ का सोडली? याबाबत अजितदादांनी पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली आहे. इंदापूरच्या सभेमध्ये अजित पवारांनी याबाबत वक्तव्य केलं आहे.
‘मी राजकारणात येईन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. कारण एक घाव दोन तुकडे हा माझा स्वभाव आहे. एखादं काम होणार असेल तर हो म्हणून सांगतो, नसेल होणार तर नाही सांगतो. मला उगाच कुणाला हेलपाटे घालून द्यायला आवडत नाही. साहेबांचा आदेश असल्याने आम्ही हू का चू केलं नाही. तर आता कधीतरी वाटतं जे आम्ही आता केलं ते २००४ ला केला असता तर बरं झालं असतं’, असं अजित पवार म्हणाले आहेत.
“सध्या या वयात अजितदादांनी पवार साहेबांना सोडायला नको होतं अशा चर्चांना पारावर सुरु असतात. मात्र मी साहेबांना कधी सोडलं नाही. मी १९८७ ला राजकारण सुरू केलं तेव्हापासून २०२३ पर्यंत साहेब सांगतील ती पूर्व दिशा समजून त्यांचं सगळं ऐकलं. १९६७ साली पवार हे पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले त्यांनाही संधी यशवंतराव चव्हाण यांनी दिली”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
“प्रत्येकाला कोणी ना कोणी संधी देत असतं. तसेच संधी शरद पवार साहेबांनी मला दिली. १९७२ ला शरद पवार हे राज्यमंत्री झाले आणि १९७५ ला मंत्री झाले. १९७८ ला माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचं सरकार पडलं आणि जनता पक्षाला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यात आलं. त्यावेळी पवार साहेबांनी चव्हाण साहेबांचं देखील ऐकलं नाही”, असे अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘कोणी तुमचा ऊस नेला नाही तर हाय पठ्ठ्या ऊस न्यायला, अन् भाव पण चांगला देईल’- अजित पवार
-Lok Sabha | ऐन लोकसभा निवडणुकीत पुण्यात ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
-मोदींना साथ देणारा नेत्याची गुगली, म्हणाले ” मी शरद पवारांना रोज भेटतो आत्ता…”