बारामती : बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीकडून सुनेत्रा पवार असा सामना रंगत आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष बारामतीच्या लढतीकडे लक्ष लागले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ इंदापूर तालुक्यात आयोजित मेळाव्यात उपुमख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
“गेल्या १० वर्षापासून बारामतीच्या खासदारासाठी मीच मतं मागायला यायचो, मात्र गेल्या १० वर्षात खासदार निधीतून एकही काम बारामतीत झालेलं नाही. सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत बसाल तर विकासकामं कशी होणार, तुमच्या लोकसभा मंतदारसंघाला मदत कशी होणार?” असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उउपस्थित करत सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“सरकारमध्ये सत्तेसाठी नाही तर काम करण्यासाठी आलो आहे. ५ -६ वेळा मी उपमुख्यमंत्री पद भूषवले आहे. उपमुख्यमंत्री होण्याचा माझा रेकॉर्ड कोणी तोडेल असं मला वाटत नाही. कारण ६-६ वेळेला उपमुख्यमंत्री व्हायला तेवढ्या वेळेला निवडूनही यायला पाहिजे. मी कामासाठी सत्तेत गेलोय, मी सत्तेसाठी हापापलेला माणूस नाही, प्रत्येक कामासाठी निधी द्यायला मी तयार आहे, पाहिजे तेवढा निधी देतो पण लोकसभा निवडणुकीत आमच्यासाठी बटन दाबा, आमच्यासाठी बटन दाबलं तर निधी द्यायला बरं वाटेल” असं अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘तुम्ही सून असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही’; अजित पवारांनी पुन्हा काकांना डिवचलं
-“ईव्हीएमचे बटन कचाकचा दाबा पण, बटन दाबताना हात आखडता घेतला तर माझा पण…”- अजित पवार
-पुणे लोकसभेच्या मैदानात AIMIM ची एन्ट्री! तगडा उमेदवार देत काँग्रेससह धंगेकरांची डोकेदुखी वाढवली
-Shirur Lok Sabha | ‘…तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू नसते’; मोहिते पाटलांचा शरद पवारांवर निशाणा