बारामती : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व उमेदवार मतदारसंघ पिंजून काढत आहेत. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातील गावांमध्ये भेट, देत दौरे, प्रचार, सभा घेतल्या. मतदारसंघात मतदारांशी बोलतान अजित पवारांनी भावनिक होत आपली खंत बोलून दाखवली आहे.
“या पाच वर्षांमध्ये सर्वात जास्त काम झाली आणि ही काम होत असताना आणि पाच वर्षांनी निवडणुकीला सामोरे जात असताना सगळ्यात जास्त कष्ट घ्यावे लागले आहेत. हे आकरितच झालं. हे जर काम मी दुसऱ्या तालुक्यात केलं असतं, तालुक्यात प्रचाराला पण जावं लागलं नसतं. लोकांनी मला तिथून निवडून दिलं असतं.
“आता आमच्या घरातच अडचण झाली, आता घरातच फूट पडल्यामुळे तुम्हालाही कळेना इकडे आड तिकडे विहीर कसं काय करायचं. लोकसभेला तुम्ही आडाकडे बघितलं, आता विधानसभेला विहिरीकडे बघा म्हणजे आड पण खुश आणि विहीर पण खुश…आतापर्यंत आपण निवडणुकीमध्ये पवारसाहेबांकडे पाहूनच मतदान मागत आलो आहोत. परंतु आता बघा, इथे फोटो पवार साहेबांचा लावला आहे. निवडणुकीला उभे कोण आहे. त्यांचा फोटो लावा ना. त्याच्या नावावर मत मागा”, असंही अजित पवार यांनी यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-कसब्यात हेमंत रासनेंची ताकद वाढली, अखिल भारतीय मराठा महासंघाचा जाहीर पाठिंबा
-रिक्षाचालक कुटुंबांच्या कल्याणासाठी आम्ही कटिबध्द, हेमंत रासनेंनी केला विश्वास व्यक्त
-‘माझा भाऊ राज्यभर फिरतोय, मग मी कशी घरी बसू?’ बारामतीच्या मैदानात शरद पवारांच्या बहिणीची एन्ट्री