पुणे : लोकसभा निवडणुकीप्रमाणे राज्यात विधानसभा निवडणुकीतही सर्वात चर्चेत असणारी बारामती मतदारसंघाची लढत आहे. कारण यंदा झालेली लोकसभा आणि आता सुरु असणारी विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार सामना रंगत आहे. बारामतीमध्ये सुरु असणाऱ्या प्रचाराची रंगत आता शिगेला पोहचली आहे. सोमवारी बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्या सांगता सभा होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये भावनिकतेचं राजकारण झाल्याचे पहायला मिळालं त्यानंतर आताही विधानसभेत दोन्ही गटांकडून मतदारांना भावनिक साद घातली जात आहे. अजित पवार यांनी रविवारी पुन्हा एकदा भावनिक वक्तव्य केलं आहे.
‘मी तीस वर्षे काम केलं, आता पुढच्याला संधी द्या. मला तर काय कळतच नाही, पवारांशिवाय दुसरा कोणी हाय का नाय ? बाकीच्यांनी काय करावं? गोट्या खेळाव्यात का ? सगळं एकाच घरात. ज्याला संधी मिळते त्याच्यात कर्तृत्व गाजवण्याची धमक असावी लागते, याचा माळेगावकरांनी विचार करावा’, असे अजित पवार यांनी म्हणाले आहेत.
“बारामतीची विकासाची वाटचाल चालू ठेवायचे असेल तर मला मतदान करा. लाडकी बहीण योजना, वीज बिल माफीची योजना, या योजना चालू ठेवायचे असतील तर घड्याळाला मतदान करा. मी यावेळी लक्ष घातलं नसतं ना तर नदीला पण आणि कॅनलला पण अडचण आली असती. मी न विचारताच करतोय पाणी येतंय सगळं होतंय एकदा जर पाणी बंद झालं ना मग अजित पवारची आठवण येईल, ही गोष्ट लक्षात ठेवा”, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
‘आदरणीय साहेबांनी सांगितलं की, दीड वर्षानंतर मी आता राज्यसभा वगैरे जाणार नाही यापासून बाजूला राहणार. पण यानंतर बारामती तालुक्याला कोण पुढे नेईल? एवढं जर समजलं तर माळेगावकरांना विनंती आहे. साहेबांना पाहून सुप्रियाला मतदान केलं, आता मला विधानसभेला मतदान करा. मला वाटायला लागलंय हे की, आपण फार काम करतो त्याची किंमत बारामतीकरांना राहिली नाही’, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
-“देश विश्वगुरु झाला पाहिजे या विचाराने भाजपचे काम”- नितीन गडकरी
-पर्वती मतदारसंघासाठी ‘विकासाची दशसूत्री’ ठरणार दिशादर्शक- आबा बागुल
-“लोकसभेला आडाकडं बघितलं, आता विधानसभेला विहिरीकडं बघा म्हणजे…”- अजित पवार
-कसब्यात हेमंत रासनेंची ताकद वाढली, अखिल भारतीय मराठा महासंघाचा जाहीर पाठिंबा