मुंबई | पुणे : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान पार पडले. या विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकालही जाहीर झाला. यामध्ये पहिला गुलाल भाजपनेच उधळला आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान पार पडले. या विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकालही जाहीर झाला. या विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार गटाच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे. अजित पवार गटाचे राजेश विटेकर हे २३ तर शिवाजीराव गर्जे हे २४ मते घेऊन विजयी झाले आहेत. लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार गटाचा हा पहिलाच मोठा विजय आहे.
काय म्हणाले अजित पवार?
“काही पुढचे राऊंड झाले तरीही महायुतीचे सर्व ९ उमेदवार निवडून येण्यास काही अडचण नाही. एकंदरीतच या निवडणुकीवर महाराष्ट्राचं लक्ष होतं. सातत्याने वेगवेगळ्या बातम्या पसरवल्या जात होत्या. आमच्याकडेही ४२ मते होती. परंतु, त्यापेक्षा अधिक मतदारांनी आमदारांनी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना दिली. त्यासाठी सर्व आमदारांचे आभार मानतो. त्यांनी टाकलेल्या विश्वासाला हे दोघेही विधीमंडळात काम करतील. पक्षाची आणि जनतेची भूमिका मांडून प्रश्न सोडवतील”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी निकाल स्पष्ट झाल्यानंतर दिली आहे.
घड्याळाची विजयी सलामी !
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार
श्री. शिवाजीराव गर्जे आणि श्री. राजेश विटेकर यांनी आपली विजयी पताका रोवली.या दणदणीत विजयाबद्दल मी आमच्या दोन्ही शिलेदारांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सहकारी… pic.twitter.com/Edh4BwszNY
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 12, 2024
“महायुतीची एक युनिटी यातून महाराष्ट्राला पाहायाला मिळाली. इथून पुढेही विधानसभेच्या निवडणुकीत अशाच पद्धतीची एकी ठेवून महायुतीचं सरकार आपल्या राज्यात निवडून आणण्याकरता परिश्रम करू. महायुतीच्या उमेदवारांना मतदान केले त्या सर्वांचे आभार मानतो आणि निवडून आलेल्या सर्वांचे अभिनंदन करतो. ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटले होते, पण एक अधिक उमेदवार आला आणि एक वेगळा रंग चढला, आता निकाल आल्यानंतर चित्र स्पष्ट झाले आहे. खूप मोठ्या संख्येने महायुतीचे आमदार विधान परिषदेत निवडून गेले आहेत”, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-विधान परिषदेमध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय; योगेश टिळेकरांचा दणदणीत विजय
-१४ जुलै रोजी बारामतीत होणार धमाका?, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजितदादांची बारामतीत सभा
-मोठी बातमी! अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह; ‘सरफिरा’ सिनेमाच्या अनेक सदसस्यांनाही कोरोनाची लागण
-धक्कादायक! पुण्यात तब्बल ४९ शाळा अनधिकृत; शिक्षण विभागाकडून कारवाई सुरु