पुणे : राज्याच्या अनेक भागातून शिक्षण आणि नोकरीसाठी विविध भागातून विद्यार्थी तरुणवर्ग पुणे शहरात येत असतात. याच पुणे शहरामध्ये आता एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) कंपनीच्या ऑफीसमध्ये काम करणारी २६ वर्षीय सीए अॅना सेबॅस्टियन पिरेयिल हिचा अति कामामुळे आणि तणावामुळे मृत्यू झाला असल्याचा आरोप होत आहे.
अॅना ही नोकरीला लागल्यानंतर अवघ्या ४ महिन्यात तिचा मृत्यू झाला आहे. अॅना कामावर रूजू झाल्यापासून सतत मोठ्या तणावाखाली असायची. अॅनाच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबियांनी कंपनीच्या भारतीय प्रमुखांना पत्र लिहित गंभीर आरोप केले आहेत. या घटनेनंतर मोदी सरकारने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तर या घटनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या घटनेबाबाबत भावना केली व्यक्त केली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
Very saddened to hear about the death of a 26-year-old employee of EY in Pune. The rising cases of young people dying due to stress need our attention. I hope Ernst & Young India will take corrective steps.https://t.co/JADVq8kRkK
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 19, 2024
‘पुण्यातील ईवाय कंपनीमधील २६ वर्षीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूबद्दल ऐकून खूप दुःख झाले. कामाच्या तणावामुळे तरुणांच्या मृत्यूच्या वाढत्या घटनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. मला आशा आहे की, ईवाय कंपनी सुधारात्मक पावले उचलतील,’ असे अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-महायुतीत पिंपरीच्या जागेवरुन कलह; शिंदेंच्या खासदारानं वाढवलं अजितदादांच्या आमदाराचं टेन्शन
-शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबच्या चर्चेवर अश्विनी जगताप म्हणाल्या, ‘मी शरद पवारांना…’
-पुणे मेट्रोची रेकॉर्ड ब्रेक कमाई; एका दिवसात साडे ३ लाख गणेशभक्तांनी केला प्रवास
-पुण्यात तिसऱ्या आघाडीची बैठक; कोणत्या २ बड्या नेत्यांना घेणार सोबत?