पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. भाजपने ९९ उमेदवारांची घोषणा करत आघाडी घेतली असली तरी दुसरी यादी मात्र खोळंबली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील काही जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच नाव नसल्याने येथून नेमकं कोण लढणार? हा सस्पेन्स निर्माण झाला होता. भाजपकडून ही जागा मिळवण्यासाठी जोर लावण्यात आला होता. अखेर टिंगरे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
वडगाव शेरी मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बापूसाहेब पठारे यांना कालच उमेदवारी घोषित करण्यात आली. दुसरीकडे महायुतीमध्ये हा मतदारसंघ मिळवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केल्याने, हा मतदारसंघ भाजपला सुटणार असल्याची चर्चा सुरू झाली. अखेर आज विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
टिंगरे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गडाकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. लोकसभा निवडणुकीत संधी न मिळाल्याने काहीही झालं तरी विधानसभेला लढण्याचा नेता मुळीक यांच्याकडून करण्यात आला होता. यानंतर आता भाजपचे जगदीश मुळीक नेमकी काय भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; बारामतीत काका-पुतण्या भिडणार
-२०१९ ला संधी हुकली पण शरद पवारांनी यंदा दिली ताकद, प्रशांत जगताप हडपसरच्या मैदानात
-Assembly Election: चिंचवडमध्ये जगतापांची प्रचाराला सुरवात; आघाडीतून कोण टक्कर देणार?
-पर्वतीत महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना! माधुरी मिसाळांनी सुरु केला प्रचार