पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्यांच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातून अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी बारामतीमधील एका महाविद्यालयामध्ये बारावीमध्ये शिकत असणाऱ्या अल्पवयीन मुलाने त्याच्याच वर्गातील मुलाचा कोयत्याने खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीमध्ये हा प्रकार घडल्याने अजितदादा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
अजित पवारांनी बारामतीमध्ये भल्या सकाळी बारामतीमध्ये पोलिसांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी पोलिसांना काही सूचना दिल्या आहेत. महिला, मुलींच्या सुरक्षेसाठी आणि शहरात होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत बड्या पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पुन्हा अशा घटना घडणार नाहीत यासाठी पाऊले उचलणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी पोलिसांशी चर्चा करून शक्ती अभियान सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.
पत्रकार परिषद, बारामती https://t.co/IeA6QykLTz
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 3, 2024
‘गुन्हेगारी, अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी प्रबोधन करण्याची गरज आहे. शक्ती बॉक्स तक्रार पेटी प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात, ऑफीसमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये काही तक्रार असेल तर टाकतील. त्या तक्रारदारांचं नाव गुपीत ठेवण्यात येईल. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था ठेवणे गरजेचे आहे, शाळा, महत्त्वाचे चौक, स्टँड दवाखाने याठिकाणी 9209394917 हा हेल्पलाईन नंबर लावण्यात येतील. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह नावाची हेल्पलाईन 24/7 चालू करण्यात येणार आहे’, असे अजित पवारांनी सांगितला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-नितीन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट; वडगाव शेरीबाबत काय होणार निर्णय?
-वडगाव शेरीत भाजपनं टाळलं पदाधिकाऱ्यांचं मतदान, मुळीकांची आशा मात्र कायम
-‘कही खुशी, कही गम’: भाजपच्या इच्छुकांना टेंशन, दोन मतदारसंघाचा दावा सोडला
-अजितदादांच्या मेळाव्याला आमदारांची दांडी; पक्षांतराच्या चर्चेवर सुनील टिंगरे म्हणाले,….
-‘ये बंधन तो…’ बारामतीत पवार काकी-पुतण्या आले आमने-सामने; पुढे काय घडलं?