पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या एका जागेवर विजय मिळाला. त्यानंतर अजित पवारांमुळे महायुतीला कमी जागा मिAळाल्या असा दावा भाजपकडून केला जात आहे तर महायुतीमध्ये गेल्यामुळे अजित पवारांना एकाच जागा मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना खळबळजनक वक्यव्य केले आहे.
अजित पवारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जावे. हे आपलं वैयक्तिक मत असलं तरीही पक्षाने यावर विचार करावा असे अमोल मिटकरी म्हणाले आहेत. “महायुतीत अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे. काहीही करून त्यांनी महायुती सोडावी यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही लोक प्रयत्न करत आहेत. यासाठी काही लोक मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते महाराष्ट्राचे राजकारण बदलवून शकतील”, असेही अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
“महायुतीत अजितदादांना एकटं पाडलं जातंय, हे आता दिसून येत आहे. कोणीही यावे काही बोलून जावे हे खपून घेतले जाणार नाही. महायुतीत अजित पवारांनी राहू नये असे यसाठी प्रयत्न देखील केले जात आहे. स्वत:हून अजित पवारांनी बाहेर पडावे यासाठी मानसिक त्रास दिला जात आहे. अशा पद्धधतीन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होऊ देणार नाही”, असेही अमोल मिटकरी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-ससूनचे नवे अधिष्ठता डॉ. एकनाथ पवारांची डॉक्टरांना तंबी; म्हणाले, ‘रुग्णांना बाहेरुन…’
-‘हे सरकार जातीयवादी, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरु केला’; नाना पटोलेंची सरकावर आगपाखड
-पोलीस भरती मैदानी चाचणीबाबत फडणवीस म्हणाले, ‘पावसामुळे तर मैदानी चाचण्या पुढे पण…’
-पुण्यात डेंग्यू रुग्णसंख्या वाढली; पालिका प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपायोजना
-‘मी बारामतीची जबाबदारी दुसऱ्यांवर दिली होती, पण…’; शरद पवारांचा अजितदादांना अप्रत्यक्ष टोला