पुणे : काँग्रेसचे मुंबईतील ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी आपल्या पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला. आता ते अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत आता उपमुख्यंमत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्टोक्ती दिली आहे.
“उद्या दि. १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांचा पक्षप्रवेश होईल. बाबा सिद्दीकी यांच्याशिवाय ११ फेब्रुवारी रोजीही काही नेते पक्षात प्रवेश घेणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पक्ष, चिन्ह, झेंडा आमच्याकडे आला आहे. त्यामुळे इतर नेत्यांनीही याचा विचार करावा”, असं म्हणत अजित पवार यांनी इतर नेत्यांनाही पक्षात येण्याचं अवतान दिले आहे.
अजित पवार आज पुण्यात दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसोबत अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“भुजबळांच्या पेकाटात लाथा घालू म्हणणाऱ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का काहीच बोलत नाहीत?”
-..अन् शिक्षण मंत्री बनले शिक्षक! चंद्रकांतदादांनी घेतली विद्यार्थ्यांची शाळा