पुणे : पुणे शहरामध्ये पावसाच्या पाण्याने अत्यंत वाईट परिस्थिती झाली असून नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत. शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. खडकवासला धरणक्षेत्रातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला असल्यामुळे शहरात पाणी साठले आहे. तसेच नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. या पूरपरिस्थीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार पुण्यात दाखल झाले. सर्व परिस्थितीचा आढावा घेतला.
पाणी सोडायचं असेल तर आत्ताच काही प्रमाणात सोडा. रात्री उशिरा पाण्याचा विसर्ग सुरू करू नये अशा सूचना यावेळी दिल्या आहे. नदीत सोडणारे पाणी कॅनलमध्ये सोडण्यात येईल त्यामुळे खडकवासला धरणातील विसर्ग कमी केला जाणार आहे. ज्या धरणात आणखी पाणी साठवण्याची क्षमता आहे त्या धरणात, कालव्यात पाणी सोडावं अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत, असे अजित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.
पुढील ४८ तास धोकादायक पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांनी अशा ठिकाणी जाऊ नये. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. दुर्घटनेत जखमी झालेल्यांचा खर्च महानगरपालिका आणि शासनातर्फे करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. वेगवेगळ्या भागात एनडीआर एफच्या तुकड्या तैनात केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आंबील ओढा भागातही खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचंही अजित पवारांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात पावासाचा हाहाकार! कामाशिवाय घराबाहेर पडू नका; पालकमंत्री अजित पवारांचे नागरिकांना आवाहन
-संघटनेतून काढलं पण शेतकऱ्यांच्या मनातून कसे काढणार? रविकांत तूपकरांचा राजू शेट्टींवर घणाघात
-लोकसभेच्या पराभवानंतर आढळराव पाटलांना राज्य सरकारचा मोठा दिलासा; सोपवली ‘ही’ महत्वाची जबाबदारी
-फडणवीसांच्या भेटीआधी अजित पवारांची दिल्लीवारी; अमित शहांसोबत रात्री १ वाजता खलबतं