पुणे : राज्यातील सत्ताबदल झाल्यानंतर बऱ्याच राजकीय नेत्यांकडून अनेक गौप्यस्फोट करण्यात आले. त्यावरुन राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप टीका-टिपण्णी पहायला मिळाली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी देखील अनेक गौप्यस्फोट केले आहेत. तसेच त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
२०१९मध्ये एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी संजय राऊत यांनीच विरोध केला होता. २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, रश्मी ठाकरे यांच्या आग्रहामुळे मुख्यमंत्रिपदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आणण्याचा प्रयत्न झाला. शरद पवारांनी जाणीवपूर्वक ही परिस्थिती निर्माण केली. कारण त्यावेळी शिवसेना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार होती. शरद पवारांनी आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री होण्याला नकार दिला होता. ते शक्य नसल्याचे जेव्हा लक्षात आले तेव्हा संजय राऊत आणि अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव शरद पवारांकडे पाठवले, असे उमेश पाटील यांनी सांगितले आहे.
शिवसेनेकडे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद राहणार तर खासदार सुप्रिया सुळेंकडे अडीच वर्षे राहणार असे ठरले होते. शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यानंतर शरद पवारांकडे पर्याय नव्हता म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्री करावे लागले. कारण सर्व आमदार अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी करत होते, असा खुलासा आता उमेश पाटील यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर, जागेवर जाऊन…’; वसंत मोरेंचा इशारा
-अडीच कोटींच्या कारसाठी अग्रवालांकडून १७०० रुपयांचा चेंगटेपणा; नेमकं काय प्रकरण?
-बाणेर-बालेवाडी भागातील नाईट लाईफला आवर घाला, लहू बालवडकरांची आक्रमक भूमिका; थेट घेतली पोलिसांची भेट
-पिंपरी चिंचवड महापालिका अॅक्शन मोडमध्ये; शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई सुरू