पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष जोमाने तयारी करत आहेत. त्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बारामतीनंतर पिंपरी-चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यामुळे आता पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला देखील ढासळणार असल्याचे चित्र दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पक्षाचे कार्याध्यक्ष, माजी नगरसेवकांनी शनिवारी (२९ जून) शरद पवार यांची भेट घेतली. पिंपरी-चिंचवडमधील तब्बल १६ माजी नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात लवकरच प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटाचे माजी आमदार विलास लांडे यांचे सुपुत्र विक्रांत लांडे यांचादेखील समावेश असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या भेटीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट ) प्रदेश उपाध्यक्ष आणि पिंपरी-चिंचवड निरीक्षक प्रकाश म्हस्के, शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत हे देखील उपस्थित होते. तर राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) शहराध्यक्ष अजित गव्हाणे, भोसरी कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक पंकज भालेकर, संजय वाबळे, राहुल भोसले, समीर मासुळकर, प्रवीण भालेकर, संजय उदावंत, आबा तापकीर यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते. त्यांचा ५ जुलैला प्रवेश होण्याची शक्यता आहे. परंतु, आम्हाला थोडा वेळ द्या, अशी अजित पवार गटांच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना विनंती केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? तर ज्या भावाने बारामतीत…’; ‘सामना’तून अजित पवारांवर ताशेरे
-पुण्यात बनावट पोलिसांकडून नागरिकांना चक्क बंदुकीने मारहाण; व्हायरल व्हिडिओवर नागरिकांचा संताप
-लोणावळ्याला जाणं पडलं महागात! भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील ५ जण गेले वाहून
-पालखी सोहळ्यात कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या; संभाजी भिडेंना पोलिसांची नोटीस