बारामती : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत होत आहे. बारामती लोकसभेत सध्या खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात लढत होते आहे. कारण पहिल्यांदाच पवार कुटुंबातील २ सदस्य एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
बारामतीची ही जागा राखून ठेवण्यासाठी दोन्ही गटाकडून शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. दोन्ही गट एकमेकांवर टीका, आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता माळेगाव येथील एक सभेत अजित पवार गटाचे पदाधिकारी रविराज तावरे यांनी लोकांसमोर मडके फोडले. हे मडके फोडल्याने आता बारामतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
‘सुनेत्रा पवार विजयी झाल्या नाही तर आपल्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल’, असे रविराज तावरे मडके फोडताना म्हणाले होते. तावरेंची कृती आक्षेपार्ह असल्याचा आरोप करत शरद पवार गटाचे नेते मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना धारेवर धरले आहे.
‘मटका फोडल्यावरून त्यांनी वेगळेच प्रश्न उपस्थित केले. दुष्काळी भागातील महिलांच्या डोक्यावर हंडा असतो. आता विकासाच्या मार्गावरून जाताना कोरडा हंडा काय कामाचा. मग तो फेकलेला बरा, असा तावरेंच्या म्हणण्याचा अर्थ होता. मात्र अनेक मोठ्या सभा घेतल्यानंतर त्यांना सामान्य कार्यकर्त्याच्या या कृतीची दखल घ्यावी लागली’, असा टोलाही आमदार अमोल मिटकरींनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार करणार’; मोहोळांचं आश्वासन
-बारामतीच झालं आता शिरूरला जायचं! अजित पवारांनी वाढवलं अमोल कोल्हेंच टेन्शन? नेमकं काय म्हणाले
-“मला आव्हान-प्रतिआव्हानात गुंतवून ठेवायचा डाव अमोल कोल्हेंचा डाव”; आढळराव पाटलांचा गंभीर आरोप
-प्रियांकाचा पती निक जोनस गंभीर आजाराच्या विळख्यात; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती..