पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने ३ दिवसांपूर्वी घेतला आहे. आयोगाच्या निर्णयामुळे राज्यभरात तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. या दरम्यान शरद पवार समर्थकांनी शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी भवनसमोर अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन करताना अजित पवार यांचे नाव असलेली कोनशिला फोडली.
अजित पवार आणि शरद पवार सर्मथकांमध्ये चांगलाच वाद झाल्याचं पहायला मिळालं. या सर्व घडामोडी दरम्यान अजित पवार हे आज पुणे दौर्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील अनेक घडामोडींवर बोलताना या विषयावरही भाष्य केले आहे.
ज्याने माझं नाव फोडलं त्याला मी महापौर केलं. मी त्याला अध्यक्ष करण्याकरिता पुढाकार घेतला. त्याला पक्षातील कोणीही सपोर्ट करत नव्हतं. माझ्याकडे आजपण त्याचा राजीनामा आहे. ‘मी एवढं काम करतोय, आंदोलन करतोय. तरी देखील सर्वजण मला त्रास देत आहेत. त्यामुळे मी राजीनामा देतो’, असं म्हणत त्याने (प्रशांत जगताप) माझ्याकडे त्याचा राजीनामा दिला होता. तो राजीनामा आजही माझ्याकडे आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
“मी जे बोलतो, ते खरं बोलतो. मला खोटं सांगून लोकांची दिशाभूल करायची नाही. त्यावेळी तो राजीनामा मी ठेवला आणि जयंत पाटील यांना सांगितले की, प्रशांत जगताप याने जरी राजीनामा दिला असला, तरी तुम्ही त्याला समजून सांगा आणि मी देखील सांगतो. एवढ्या मोठ्या परिवारात थोडसं भांड्याला भांड लागतं. त्यामुळे एवढं काही मनावर घ्यायचं काही कारण नाही. त्यामुळे मी त्याला वेळोवेळी योग्य सल्ला देण्याचं काम देखील केलं”, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
“मध्यंतरी त्याच्या वेगळ्या बातम्या देखील आल्या. तरी देखील मी त्याला सावरून घेतलं. त्याही पुढे जाऊन माझ्याकडे काही निनावी पत्र देखील आले. एखादा कार्यकर्ता आपल्यासोबत काम करत असल्यावर त्याला ना उमेद करणं किंवा उघडं पाडणं हा माझा स्वभाव नाही”, असे सांगत अजित पवारांनी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना चांगलेच सुनावले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवार गटाचा युवक मेळावा; काय असणार पुढील रणनिती?
-‘गुंडाने गुंडाचा काटा काढला हे खरं आहे की नाही? मोहोळ हत्याकाडांवर अजितदादांचं वक्तव्य
-शिक्षण संस्थांमध्ये अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार; संभाजी ब्रिगेडची चौकशीची मागणी