पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवारांना मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला असता ते चांगलेच भडकल्याचे पहायला मिळाले. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं. या प्रकरणी धनंजय मुंडेंचा आरोपींशी संबंध असल्याने विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आज याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार पत्रकारांवर भडकल्याचे काहिसे भडकल्याचे दिसले.
‘संतोष देशमुख हत्या प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही. असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं आहे. आमचंही तेच मत आहे. या प्रकरणात सीआयडी, एसआयटी चौकशी करत आहेत तसेच न्यायालयीन चौकशी देखील सुरु आहे. यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. सगळ्यांना कायदा समान आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, धनजंय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधकांना त्यांचं राजकारण लखलाभ धनंजय मुंडेंचा राजीनामा हे राजकारण असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत. त्यातच ‘जोपर्यंत पुरावा सापडत नाही, तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही’, अशी भूमिका उपमुख्यमंत्री पवारांनी घेतली असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘एका जत्रेनं देव म्हातारा होत नाही’; शरद पवारांच्या खासदाराला मोरेंनी सुनावलं
-ठाकरेसेना स्वबळावर लढणार; ‘हा तर शिवसैनिकांचा विश्वासघात’
-‘लोकांची काम करण्यासाठी खात्याचं काम…’; अजित पवारांच्या मंत्र्यांना सूचना