पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवत सर्व पक्षांकडून तयारी सुरु आहे. निवडणुकीच्या दृष्टीने बैठका सुरु आहेत. पण महायुतीची बैठक अद्याप झालेली नसून लवकरच बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अन्याय केला असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. याबाबत भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी वक्तव्य केले आहे. अजित पवारांनी अन्याय केला की नाही? हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. अजूनही कोणत्याच प्रकारची जागा वाटप झाली नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले आहे.
‘बैठकीनंतर लवकरच जागावाटपाच्या संदर्भात निर्णय होईल, त्यावेळी निर्णय होईल त्यावेळी बघू. पण इंदापूरच्या जागेचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील असे अजित पवारांनी सांगितले आहे. महायुती म्हणून आम्ही लढण्याची तयारी केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पराभवाचे चिंतन देखील सुरु आहे’, असे देखील हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय वादानंतर अजित पवार गट महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यामधील राजकीय वैर हळूहळू कमी झाले. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. त्यावरुन महायुतीला कमी जागा मिळण्याचे कारण अजित पवारांना महायुतीत घेतल्याचे अनेकांनी बोलून दाखवले तर आज पुणे भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी अजित पवारांना महायुतीतून काढा म्हणत आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. आता आगामी विधानसभेत अजित पवार महायुतीसोबत असणार की पुन्हा शरद पवारांसोबत जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘तुमच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसा आम्ही डायपर म्हणून वापरतो’; अंधारे- देसाईंचा वाद काही थांबेना
-‘आम्ही अजितदादांसाठी सत्ता आणायची का? त्यांना महायुतीतून बाहेर काढा’; भाजप कार्यकर्त्यांची खदखद
-पुणेकरांनो सावधान! डासांपासून सावध रहा; शहरात सापडला झिकाचा तिसरा रुग्ण