पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना आजवर अनेकदा संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे. सुप्रिया सुळेंच्या समर्थकांकडून त्यांचा उल्लेख ‘संसदरत्न’ असा करण्यात येतो. याचाच धागा पकडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. अजित पवार यांनी आज बारामती कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना त्यांनी सुप्रिया सुळे, शरद पवारांवर टीका केली आहे.
“आपल्याला बारामतीचा, महाराष्ट्राचा विकास करून घ्यायचा आहे. यासाठी नुसता खासदार निवडून द्यायचा आणि त्याने संसदेत फक्त भाषणं करायची, यातून प्रश्न सुटत नाहीत. मी मतदारसंघात न येता, मुंबईत बसून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळविला असता तर मतदारसंघातील कामं झाली असती का? नुसतं सेल्फी घेऊन कामं होत नसतात”, अशा शब्दात अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.
“लोकसभा निवडणुकीत काही लोक भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. पण भावनिक होऊन भाकरीचा प्रश्न सुटत नाही. भावनिक होऊन कामं होतं नाहीत. कामं तडफेनेच करावी लागतात. ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा. बारामतीकरांनी मला याआधी विक्रमी मतांनी निवडून दिले आहे. त्याचप्रमाणे आमच्या लोकसभेच्या खासदारालाही विक्रमी मतांनी निवडून द्या, असेही आवाहन करत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंचे नाव न घेता कान टोचले आहेत.
‘मी काम करतो. मला कामाची आवड आहे. मला सेल्फी काढायची सवय नाही. पण अलीकडे काही जण फोन करू लागले आहेत, कसे काय, पाणी आहे का? आता हा काय प्रश्न झाला का? लोकसंपर्क आता त्यांना सुचत आहे’, असं म्हणत अजित पवारांना सुप्रिया सुळेंना सुनावलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मी मुख्यमंत्रिपदासाठी हापापलेला माणूस नाही; अजित पवारांचं स्पष्ट वक्तव्य
-“मी त्यांच्या पोटी जन्माला आलो नाही हेच दुर्दैव”; अजित पवार गहिवरले
-“आम्ही कोणाचाही पक्ष चोरला नाही, संसदेत भाषणं ठोकून कामं होत नाहीत”
-मनोज जरांगेंची प्रकृती गंभीर; आक्रमक आंदोलकांकडून पुण्यात ठिकठिकाणी चक्काजाम