बारामती : जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे, तसतसा प्रचाराला रंग चढत आहे. राज्यातील सर्वाधिक चर्चेच्या बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा प्रचार देखील शिगेला पोहचला आहे.ो यातच ‘ज्याठिकाणी पवार आडनाव दिसेल तिथेच मतदान करा असे म्हणत आधी साहेबांना मग मुलीला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्या’, असं आवाहन आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केले आहे. अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
“आपण तर पहिल्यांपासून पवारांच्या पाठीशी राहिलो आहे. मग आता बारामतीकरांच्या समोर आपण काय करायचं? असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशीही आता ज्याठिकाणी पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं. त्यामुळे तुम्हाला कुठेही या प्रश्न येणार नाही. तसेच जी परंपरा आपण पाळत आलो आहोत. ती परंपरा खंडीत केली नाही, अशीही भावना निर्माण होणार नाही”, असेही अजित पवारांनी म्हणाले आहेत.
“१९९१ साली खासदारकीला लेकाला निवडून दिलं. त्यानंतर वडिलांना निवडून दिलं. त्यानंतर लेकीला ३ वेळा निवडून दिलं आणि आता सुनेला निवडून द्या. मग लेकही खुश, कन्याही खूश, सुनही खुश आणि तुम्हीपण खुश”, असे म्हणत अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली. त्यावर उपस्थितांचा एकदाच हश्शा पिकल्याचे पहायला मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांकडून दुभंगलेली मनं जोडण्याचा प्रयत्न; ‘जनसंवाद सभे’चे आयोजन
-पाणी देण्यासाठी धमकावलं! शरद पवारांच्या टीकेवर अजित पवारांचा जोरदार पलटवार
-ऐनवेळच्या ठरावाची माहिती का लपवली जाते?; ‘आप’ची राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार, केली ‘ही’ मागणी
-“नातं हे नात्याच्या जवळ ठीक, पण अजितदादा एखादी भूमिका घेतात तेंव्हा…” सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या