पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज सर्व प्रचारतोफा थंडावल्या आहेत. राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या अध्यक्ष असणाऱ्या बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये रविवारी दुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळे यांना या टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवण्यात आले. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यावरुन विरधकांकडून अजित पवार गटावर टीकेची झोड उठवण्यात आली. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.
“काल मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो. त्यावेळी बारामतीतील टेक्सटाईल पार्कमध्ये जे घडलं मला पण वेदना झाल्या. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कधी पण माझे विरोधक आले तरी त्यांचं काम होण्यासारखं असेल तर मी करतो. काकींचा तर प्रश्नच नाही. त्या माझ्या आईसारख्या आहेत आणि मी खोलात गेलो मला नंतर कळलं तिथे नेमकं काय घडलं ते”, असे अजित पवार म्हणाले आहेत.
“घरात कुणी माझ्या विरोधात उभा राहिलं तरी त्यांना देखील लोकशाही तो अधिकार आहे. मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही पण इतक्या खालच्या पातळीला जाऊ नका त्याच्यामध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका. त्यासंदर्भात बारामतीची जनता सुज्ञ आहे. मी इतकं काम केलं मी इतकं सगळं सांगितलं तरीदेखील बारामतीकरांनी मला लोकसभेला झटका दिला”, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-‘देशात बारामतीची ओळख कोणामुळे हे सगळ्यांना माहितीये’; सांगता सभेतून शरद पवारांचा अजितदादांवर निशाणा
-‘पर्वती’चा १५ वर्षात खुंटलेला विकास ५ वर्षात पूर्ण करणार; आबा बागुलांची ग्वाही
-गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवायचं! रासनेंसाठी कसब्यातील मंडळांची वज्रमूठ
-कसब्यात हेमंत रासने यांना वाढते समर्थन, विविध समाज संघटनांकडून पाठिंबा जाहीर