पुणे : चौथ्या टप्प्याचे मतदान येत्या सोमवारी १३ मे रोजी पार पडणार आहे. चौथ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ, पुणे आणि शिरुर लोकसभेचे मतदान पार पडणार आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे महायुतीचे शिरुर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी अजित पवारांनी प्रचार तोफांचा धडाका लावला. शिरुर मतदारसंघात येणाऱ्या परिसरात भव्य रोड शोचे आयोजित केला.
आढळराव पाटलांच्या प्रचाराच्या माध्यमादरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधा बोलण्याची एक संधी अजित पवारांनी सोडली नाही. आजही पुण्यात बोलताना अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला आहे.
🔰11-05-2024 🛣️ वाघोली, पुणे
⏱️ शिरूर लोकसभा क्षेत्र | वाघोली, पुणे येथील महायुतीच्या जाहीर सभेतून लाईव्ह
https://t.co/ZyoJuLFAKx— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 11, 2024
“जो माणूस राजीनामा द्यायाला निघाला होता. जो अभिनेता आहे, ज्यांनी ५ वर्षे काम केले नाही. अमोल कोल्हे संसदेत जात नव्हते. कधी बैठकीला येत नव्हते. सांगायचे की, दादा माझं शूटिंग सुरू आहे. मला यायला जमणार नाही. ते कलाकार आहेत. त्यांना तुम्हाला वेळ द्यायला जमणार नाही. मला आधी म्हणाले होते की, आता निवडणूक लढणार नाही. पण आता पुन्हा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत”, असे म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना ऑफर दिली नाही तर…’; देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले
-‘१३ तारखेला विरोधकांचा बाजा वाजणार’; बारणेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचा रोड-शो
-‘जे कामाने निवडून येत नाही, ते जातीची ढाल पुढे करतात’; नितीन गडकरींचा रोख कोणाकडे?
-“फ्लॉप ठरलेल्या कलाकाराला पुन्हा संधी द्यायची नाही…” फडणवीसांचा कोल्हेंवर प्रहार