पुणे : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे रविवारी आळंदी येथे आले होते. त्यावेळी त्यांनी ‘समर्थ रामदास स्वामींच्या मार्गदर्शनामुळे शिवरायांना पुढील कार्य करता आले’, असा दावा केला होता. योगी आदित्यनाथ यांच्या या दाव्यानंतर राज्यभरात शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.
‘काही लोक वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, खरा इतिहास काय आहे तो जगाला माहिती आहे. आमच्यादृष्टीने राजमाता जिजाबाई याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक होत्या’, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे नेते शरद पवार यांनी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचे खंडण केले. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
‘राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना घडविले. त्याच शिवरायांच्या गुरु आणि मार्गदर्शक होत्या, त्यांनी महाराजांना प्रेरणा दिली. याच प्रेरणेतून स्वराज्य स्थापन करायचे या ध्येयाने शिवरायांनी मावळ्यांचे सैन्य उभे करुन स्वराज्याची उभारणी केली, हा इतिहास आहे. याच इतिहासातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र प्रेरणा घेतो’, असे अजित पवार यांनी ठामपणे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी तक्रार दाखल करुन नाही म्हणून तरुणाने स्वत:ला घेतलं पेटवून
-मराठा आरक्षण: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ उद्या पिंपरी-चिंचवड बंद!
-लेकीसाठी बापाचा पुढाकार; शरद पवार सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत तळ ठोकणार
-लोकसभा निवडणुकीसाठी मनसे जय्यत तयारी; राज ठाकरे जुन्नर दौऱ्यावर
-वृक्षरोपणाला जागा नाही तरीही पुणे महापालिका लावणार ५ कोटी रुपयांची झाडे