पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर सडकून टीका करत असतात. पुण्यात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“माझ्यात वाईट गुण होते तर इतके वर्ष गप्प का बसलात? आमच्या डोक्यात प्रकाश पडायला १७ वर्ष लागली म्हणून आत्ता सगळं आठवतंय”, असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
“१७-१८ वर्ष आम्ही (सुप्रिया सुळे-अजित पवार) आम्ही एका संघटनेत काम केलंय. घटस्फोट होऊन सहाच महिने झाले आहेत. पण माझ्यातले असेअसे गुणे लोकं सांगत आहेत, जे मी कधी ऐकलेले पण नाहीत. पण माझा त्यांना एक प्रश्न आहे, जर इतके माझ्यात वाईट गुण होते तर १७- साडे १७ वर्ष गप्प कशाला बसलात? असं काय झालंय की आता तुम्हाला हे सगळं दिसायला लागलं? आत्ता माझ्या चुका का दिसत आहेत?”असा सवाल विचारत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना केला होता. सुप्रिया सुळेंच्या या टीकेला अजित पवारांनी आज प्रत्युत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याची जागी आम्हीच जिंकणार! संजय काकडे ‘इन ॲक्शन मोड’; मोहोळांची ताकद आणखीन वाढली
-वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी चांदणी चौक प्रकल्प पथदर्शी ठरणार – मोहोळ
-“राष्ट्र प्रथम विरुध्द परिवार प्रथम असं मानणार्यांमध्ये हा संघर्ष”- प्रकाश जावडेकर
-अजित पवारांची भोरमध्ये “सर्जिकल स्ट्राइक”; शरद पवार गटाला मोठा धक्का
-पुण्याला सभेसाठी जाताना शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड