मुंबई : आज देशभरात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी सर्वजण आपापल्या भावा-बहिणींसोबत साजरी करत असतात. अशातच संपूर्ण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या बहिण खासदार सुप्रिया सुळे यांच्या रक्षाबंधनाकडे लक्ष लागून आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या राजकीय वादानंतर आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे रक्षाबंधनाच्या निमित्ताने एकमेकांना भेटणार का? याकडे सर्वांच्या नजरा आहेत. अजित पवार हे आज मुंबईत असून त्यांचे नियोजित कार्यक्रम सुरु आहेत. तर सुप्रिया सुळे या नाशिक दौऱ्यावर असून त्या देखील त्यांच्या नियोजित कार्यक्रमांना हजर राहत आहेत. अशातच दोघेही माध्यमांसमोर आल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दोघांनीही उत्तर दिले आहे.
‘मी सध्या मुंबईत आहे. सुप्रिया मुंबईला असेल तर मी तिच्याकडे जाऊन राखी बांधेन. मुंबईत माझ्या जेवढ्या बहिणी असतील त्यांच्याकडे जाऊन मी राखी बांधेन’, असे अजित पवार म्हणाले. तर सुप्रिया सुळे या नाशिकमध्ये असून त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाल्या की, ‘मी नाशिकमध्ये आहे. कुणीही राखी बांधून घ्यायला आलं तर स्वागत करेन. भाजपचे कोणी आले तरीही मी स्वागत करेन आणि राखी बांधेन’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘बारामतीतून निवडणूक लढविण्यात रस नाही’ अजितदादांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, ‘जिथून…’
-कसब्यात आरोग्याचा महायज्ञ! तब्बल १२ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
-‘माझा फोन हॅक झालाय’; सुप्रिया सुळेंच्या मोबाईल हॅकने राजकीय वर्तुळात खळबळ
-मोठी बातमी: मालेगावात अजित पवारांच्या जीवाला धोका; गुप्तचर विभागाची माहिती
-Big Boss Marathi: सुरज चव्हाणच्या ‘झापूक झुपूक’वर अक्षय कुमारही थिरकला